रविवार, ३ फेब्रुवारी, २०१९

म्या पाहिलेला पाऊस.....



म्या पाहिलेला पाऊस.....

दिवाळीच दिवस थोड्याच दिवसात दिवाळी येणार होती पण तव्हर आमचा शेवंती आणि बाकीच्या फुलांच्या सिजन ला सुरुवात झाली होती. सगळीकडे आमच्या मळ्यात लोकांची फुलं तोडण्याची गडबड चालली होती...पावसाचं वातावरण झालेलं, ढग काळेभोर दाटुन आलेलं आणि वेळ साडेपाच सहाची आसल. ते पावसाचं वातावरण पाहुन मला घरच्यांनी मला मलभारे वस्तीवरच्या मोटरचं खोक बंद करायला सांगितलं.... म्या मनात विचार केला कि कुणाला तरी सोबत घ्यायचं आन मोटार बंद करून यायची......मी निघणार तेवढ्यात वडील म्हणाले कि मी येतो सोबत .... रानातून आम्ही घरी येऊन घरून गाडी घेऊन निघालो......वातावरण तर पावसाचं झाल्याल पण लगीच येईल असं काही वाटलं नाय आम्ही मलभारे वस्तीवर विहरीवर पोहचलो. मोटरचं खोक नीट झाकलं आन निघालो थोडं पुढं गाडीपाशी आलो टिपटिप चालु झाली... मनात म्हणलं आता घरी जाऊस तव्हर भिजतोय.... वातावरण तर सहा साडेसहाला पार अंधारून गेलं होतं म्या गाडी चालु केली वडील गाडीवर बसलं आणि थोडी पुढं गाडी गेली आन पावसानं बरसायला सुरुवात केली ते मोठालं थेंब त्यांनी गाडीची लाईट लावूनही पुढचं काही दिसना शेवटी गाडीवरून उतरून चालु गाडी हातांनी चालवीत घेतली ..... त्यो पाऊस इतका कोसळत होता कि गाडी चालवत घेऊनही त्या अंधारात पुढचं काही जास्त दिसत नसल्यानं माझ्याकडून मलभारे वस्तीच्या शाळेमाग गाडी पडली तशीच उचलुन पुन्हा चालवीत नेऊन आम्ही भाऊंच्या घरामाग गाडी लावली.... आन भाऊंचा दरवाजा वाजवला अंधार पडल्यानं कोणी अनोळखी समजुन भाऊही दार उघडीना शेवटी ओळख सांगितली तेव्हां भाऊंनी दरवाजा उघडला आणि अंग पुसायला टॉवेल दिला. अंग जरी पुसलं तरी पावसात भिजल्यानं अंगात भरलेली थंडी काय जाईना.... एक दीड तासांनी पाऊस उघडला.... मग  घरी जायला निघालो सगळीकडं पाणीच वाहताना दिसायचं..... खरंच मी पाहिलेला तो पाऊस मला थोडी भीती दाखवुनच गेला...... नायतर पाऊस म्हटलं कि मन भिजायला आतुर होतं आणि पावसात जायला ओढ घेतं....... पण तो पाऊस मला कधी थांबलं आस वाटु लागलं होतं.खरंच हा पाऊस बी किती सोंगं बदलतो कधी अनुभवायला गॉड वाटतो तर कधी त्याचं अक्राळ विक्राळ रूप पाहुन नकुसा वाटतो.....पण काहीही असो मला पाऊस आवडतो........

© लेखक : राहुल दादा बिचकुले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...