रविवार, ३ फेब्रुवारी, २०१९

प्रेम स्पर्श ( कविता )

तुझ्या मनातला भाव 
माझ्या ओठावरी नाव

होतो मनाला हर्ष ग 
तुझ्यापाठी फिरता फिरता 
गेलं माझं वर्ष ग




कॉलेज मधी होती 

देखणी तू पोर
तुझ्यासाठी झुरतो
मी ग प्रेम चोर




तुला पहिल्यापासूनी

विसरलो देहभान
लागेना भूक लागेना तहान
होतो प्रेमाचा स्पर्श ग




तुझ्यापाठी फिरताफिरता 

गेलं माझं वर्ष ग



तुझी पाहुनीया अक्कल 

लढविली मि ग  शक्कल
थोडं दूर थांबून
पाहायचो ग चोरून




तुला पाहता पाहता मी ग 

झालो थोडा येडा
तुला पाहुनिया धीर येतो थोडा थोडा
होतो मनाला हर्ष ग 




तुझ्यापाठी फिरता फिरता 

गेलं माझं वर्ष ग



तू ग कळी गुलाबाची

जडली प्रीत झाली तू जीवाची
जीव तुझ्यावर जडला
झालो मी प्रेमवेडा




धुंद गीत गातो 

थोडं प्रेमात न्हातो
या प्रेमाच्या धुंदीत 
झाली प्रेमाची बरसात ग




तुझ्यापाठी फिरता फिरता

गेलं माझं वर्ष ग



तुझं माझं नातं

होतं एक प्रेमगीत
धुंद प्रेमाच्या दुनियेत
कसं राहिलं ते रित 




हे नातं किती गोड

लावी जीवाला या ओढ
दूर असता तू
सोबतीचा भास मला होतो ग




तुझ्यापाठी फिरता फिरता

गेलं माझं वर्ष ग



लागता प्रेमाची चाहुल

टाकलं पुढचं पाऊल
दाखवलं प्रेम ते बोलून
माझं हृदय ते खोलून




माझ्या हृदयाच्या दालनी

ठेवलं तुला मी जपुनी
घेत मिठीत तुला
जागा होतो झोपेतुनी
हे सारं स्वप्न होतं ग




हे स्वप्न पाहता पाहता

झोप माझी गेली ग


  ©कवी राहुल दादा बिचकुले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...