मंगळवार, १२ फेब्रुवारी, २०१९

पावन भूमी खंडोबारायाची ( एकेरीवाडी )


पावन भूमी खंडोबा रायाची
काय महती सांगु एकेरीवाडीची
माणसं आहेत प्रेमळ
पसरला माणुसकीचा दरवळ

साधेपणा भरला साऱ्या माणसांत
देव खंडोबा राहतो एकेरीवाडीत
माणसं शेतात राबती
नाव आहे तालुक्यामधी

साधी भोळी माणसं इथं
जपती आजही माणुसकीच नातं
माणूस म्हणून जगती
देव माणसांत शोधती

इथं माणसाला मान
होतो पाहुण्यांचा सन्मान
नाही कोणाचा अपमान
हिच गावाची शान

हि भूमी शेतकऱ्यांची
शेतकरी कष्टकऱ्यांची
कामाला जोड कष्टाची
नजर गावावर खंडोबाची

धन्य धन्य एकेरीवाडी
धन धान्य शेती बाडी
ख्याती तालुक्यात गावाची
एकेरीवाडीच्या खंडोबाची

पावन भूमी खंडोबा रायाची
काय महती सांगु एकेरीवाडीची
माणसं आहेत प्रेमळ
पसरला माणुसकीचा दरवळ

© कवी राहुल दादा बिचकुले

संदर्भ : माहिती संकलन - भटकंती दौंड तालुका श्रीकांत हंडाळ  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...