रविवार, ३ फेब्रुवारी, २०१९

शिकलो पण कुठे चुकलो.....

सकाळची वेळ होती श्रीपती घरापुढे अंगणात काम करीत होता. पोरगा श्याम बॅग घेऊन कॉलेजला पेपरला चाललेला असतो. तेव्हड्यात श्रीपती श्यामला बोलतो. श्यामा आरं आता कुठवर शिकायचं थोडंफार काम बघ कि,........ बाबा आता माझं पोस्ट ग्रॅज्युएशियन पूर्ण होईल मग लागेल ना मला काम... .... हा बाबा.... पण लवकर बगायच काहीतरी काम ... लोकांचं कर्जपाणी जास्त झालंय आता तेबी दिलं पाहिजे...   आई पाणी घेऊन आलेली असते .... खरंच श्यामा उरीक बाबा आता तुझं शिक्षाण .... कुठं तरी कामा धंद्याला लागला म्हंजी आम्हाला बी पाव्हण्या रावळ्यात पोर बघायला .........माझं पेपर होऊदे कि मग लागलं कामाला मंग बघ बघायची तर पोर मी काही म्हणणार नाय......... श्याम पेपरला जातो. परीक्षा देऊन माघारी येतो.. दुसऱ्या दिवसापासून काम शोधायला सुरुवात करतो. या कंपनीत इंटरव्ह्यूव दे त्या कंपनीत इंटरव्ह्यूव दे परंतु..... प्रत्येक ठिकाणी उत्तर येत ... फक्त शिक्षण असून चालत नाही तर तुमच्याकडे स्किल..... कौशल्ये पाहिजेत... ना तुम्ही आजवर प्रत्यक्षात काम केलं ना तुम्हाला कामाचा अनुभव आहे. फक्त कागदावर लिहुन आणि कागदावरच वाचुन कुणी परफेक्ट काम करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला आम्ही काम देऊ शकत नाही. आणि दिलं तर ते सुद्धा हेल्पर म्हणुन करावे लागेल.      तसाच निराश होऊन श्याम घराकडे परततो. वडिलांना आपल्या शेतात मदत म्हणुन काम करण्यास सुरुवात करतो परंतु शेतातील कामही त्याला जमत नाही. कारण आजवर तो फक्त शिकत राहिलेला असतो. आणि ती शिक्षणाची पद्धत फक्त कागदावरच मांडता येईल अशी असते. त्यामुळे तो एक उच्च शिक्षित बेरोजगार असतो. आणि हे घडत आहे फक्त आजच्या शिक्षण पद्धतीमुळे

          निष्कर्ष : माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनो.... कथा लिहण्याचा उद्देश एकच आहे कि,   आपण पुस्तकी शिक्षणात खुपच प्रगती करत आहोत. परंतु या पुस्तकी शिक्षणाचा उपयोग तुम्हाला प्रत्यक्ष कार्य करताना पुरेपूर होईल असे नाही. त्यामुळे प्रत्येकाने शिक्षण घेत असताना. प्रत्यक्ष कला कौशल्ये विकसित करा. आणि प्रात्यक्षिक अभ्यासक्रमावर भर द्या. नाहीतर शिक्षणाच्या शिखरावर आपण लवकर पोहचू परंतु प्रत्यक्षात चढाई करत असताना आपल्याला खुप अडचणी येतील. तेव्हा फक्त शिक्षण पद्धतीला दोष देऊ नका. आपल्या कला कौशल्याला वाव द्या आणि प्रत्यक्षात काम करून ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा. त्यावेळी आपण जिवनातील जगण्याच्या लढाईला सामोरे जाऊ शकु..... 
        उदा : पुस्तकातून युद्धकला शिकलो तर रणांगणात कधीही आपण युद्ध जिंकु शकणार नाही.... आणि प्रत्यक्षात रणांगणात युद्धकला शिकलो तर आपण कधीही युद्ध हरणार नाही. कारण प्रत्यक्षात जेव्हा आपण शिकतो त्यावेळी ज्ञानाबरोबर आत्मविश्वास वाढत असतो....                 


© लेखक :- राहुल दादा बिचकुले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...