मंगळवार, १२ फेब्रुवारी, २०१९

माहेर


माहेर

माहेर माहेर
आहे मायेचा सागर
एक हक्काचा आधार
निखळ प्रेमाचा निर्झर

माहेर नातं रक्ताच
व्यासपीठ बोलण्याच
हक्कान मागण्याच
आहे हक्काच कोठार

माहेर एक जिव्हाळा
माहेर दु:खावर फुकंर
माहेर मायेचा हात
माहेर मुलीच जन्मघर

असं हे माहेर
नदीचाच एक तीर
अल्याड माहेर पल्याड सासर
असं हे माहेर माहेर

© कवी राहुल दादा बिचकुले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...