एक महिन्याची काव्यामाला ४/०७/२०१८
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला.
धुंद वाऱ्यावरी
सैर
साठवी विचारांचं
काहूर सुगंधी मनाचा मोहर
मी सांगू कुणाला
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला. 1
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला
धुंद धुंद वारा
बरसती रिमझिम धारा
होऊनिया चिंब
शहारे अंग
ऋतू पावसाळा भारी
बरसती रिमझिम सरी
या सरीत भिजले मन
मी सांगू कुणाला
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला 2
मन बाजींद जपत छंद
आवरू कसं मी
मनाला
किरणे सोनेरी
अंगणात आली
धरती हिरवी अंगी
रत्ने ल्याली
मन शहारले मन
बहरले
सांगू मी कुणाला
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला 3
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला
लाली लाल गुलमोहर
फुलला
आला उल्हास बहर
मनाला
पाहुनीया या
सुंदर सौंदर्याला
जे भुलवी माझीया
मनाला
मी सांगू कुणाला
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला 4
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला
आवाज ढोलांचा घुमतो
कानी
भक्तीनाद निर्माण
होतो मनी
धूप दिप सूंदर
सुवास
आंनद देतो मनास
काय हे सुंदर
भक्तीमाधुर्य
मी सांगू कुणाला
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला 5
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला
काय बोलू
मातृत्वाला
गाय फोडता हंबरडा
वासरू बिलगती
आईला
दृश्य मातृत्वाचे
छान स्पर्शून जाती मनाला
मी सांगू कुणाला
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला 6
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला
पालखी निघाली
पंढरीला
नमस्कार माझा
त्या माऊलीला
एकत्र चालतो
अगणित वारकरी मेळा
धन्य तो आषाढी
सोहळा
आंनद होतो मनाला
मन बाजींद जपत छंद
आवरू कसं मी
मनाला 7
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला
तुकोबा आले
आमुच्या गावाला
मन रमले
तुकोबाच्या सेवेला
उधाण आले आनंदाला
धन्य तो पालखी
सोहळा
मोहवी माझ्या
मनाला
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला 8
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला
धन्य धन्य पालखी
सोहळा
पाहू याची देही
याची डोळा
राहो सदा संत
संगतीला
आंनद मिळेल मनाला
बदलेल आपुल्या
जीवनाला
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला 9
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला
या सांजवेळेला
सूर्य नभी झाकला
लपविले तेजाला
भुलविले माझीया
मनाला
मी सांगू कुणाला
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला 10
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला
आला आला पावसाळा
तरीही जाणवे
उन्हाच्या झळा
शेतकरी हात जोडी
दुष्काळा
दुःख होतं मनाला
मी सांगू कुणाला
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला 11
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला
शेतकरी जगाचा
पोशिंदा
त्याला पावसाची
आशा
धावून ये
वरूणराजा
का पोशिंद्याला
सजा
नको दुःख
शेतकऱ्याला
दुःख होतरं मनाला
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मनाला 12
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला
चार दिवस झाले
उसंत मिळाली नाही
देह आजारी होता
तरी मन थांबले नाही
मनातल्या मनात
काव्य गुणगुणत राही
सुंदर रचना आल्या
ओठी लेखणी विना कागदावर उतरल्या नाही
मी जपतो मनाला मन
जपत काव्याला
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला 13
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला
आज आखाडी
एकादशीला
उपास लहान सान
बाया बापुड्याला
ओढ लागली मनाला
भेटण्या त्या
विठु माउलीला
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला 14
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मनाला
गॉड गॉड पोळ्या
त्याला गुळाची ती
जोड
आज बारस विठ्ठला
एकादशीचा उपास
तरी सोड
करीतो विनवणी
तुला विठ्ठला
गोड धोड जेवण
बारशीला
जेऊनी तृप्त हो
विठ्ठला
मिळेल आंनद माझ्या
मनाला
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला 15
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला
उंच आकाशात पाहता
चंद्र मला दिसला
चांदण्याचा सहवास
त्याला
पार भुलूनी तो
गेला
त्याच्याकडे
पाहता हळुच गाली हसला
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला 16
मन बाजींद जपत छंद
आवरू कसं मनाला
कसं आडवु या
स्वैर वाऱ्याला
कसं झाकु
चमकणाऱ्या ताऱ्याला
नाही रोखता येत
सुर्याच्या तेजाला
कसं रोखु शीतल
चंद्राला
नाही थांबवता येत
धावत्या मनाला
मन बाजींद जपत
छंद
आवरू कस मी मनाला
17
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला
ज्यांनी मला
घडविला
नमस्कार माझा
त्या गुरूंला
गुरू मानले मनाला
पूजीतो त्या
उपदेशाला
आचरितो त्या
स्वैर विचाराला
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला 18
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला
आजचा दिवस उजाडला
नाही उल्हास
मनाला
शब्द आठवेना मला
कशी निर्माण होईल
काव्यमाला
प्रश्न पडला
मनाला
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला 19
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला
चंद्र मेघांनी
झाकला
काय वर्णू
चांदण्यांच्या तेजाला
शोभा आली अंबराला
पडली भुरळ मनाला
मन भाळले त्या
सौंदर्याला
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला 20
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला
आज अंगारकी
चतुर्थीला
गेलो गणपती
दर्शनाला
त्या भीमा तटाला
सिद्धटेक
सिद्धिविनायकाला
भक्तिभावाने भक्त
येती दर्शनाला
पाहुनी तो क्षण
भुरळ पडती मनाला
मनापासुनी पूजीतो
मी श्री गणेशाला
मन बाजींद जपत
छंद
आवरू कसं मी
मनाला 21
आवरू कसं मी मनाला
लाल हिरवी कोवळी पालवी
माझिया मनाला भुलवी
वृक्ष एक ढंग अनेक
जणु म्हातारपणी बालपण
तसे उमलले रूक्ष पानात कोवळी पानं
मन बाजींद जपत छंद
आवरू कसं मी मनाला 22
मन बाजींद जपत छंद
आवरू कसं मी मनाला
दिवसाच्या सुरुवातीला
शुभ संदेश तो आला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
प्रश्न मला पडला
माझा जन्मदिवस मला का नाही आठविला
ज्याने दिला आठवणींना उजाळा
मित्र म्हणतात त्याला
आनंदाचे क्षण दाखवी मला
मन बाजींद जपत छंद
आवरू कसं मी मनाला 23
मन बाजींद जपत छंद
आवरू कसं मी मनाला
धुंद काव्हरं मन बावरं
भुलतं हरघडीला
सृष्टी सौंदर्य गोड माधुर्य
भुरळ पाडीते मला
कधी सावली कधी ऊन कधी रिमझिम धारा
भुलवी मनाला हा खेळ सारा
मन बाजींद जपत छंद
आवरू कसं मी मनाला 24
©✍ राहुल दादा बिचकुले