रविवार, ५ डिसेंबर, २०२१

थोडफार वाचलं पाहिजे...

 उभं आयुष्य जगत असताना

अनुभवानं थोडंफार शिकलं पाहिजे
नको म्हणु नको गड्या
पण जगण्यासाठी थोडंफार वाचलं पाहिजे..!

उघड्या डोळ्यांन जग किती पाहशील
कारण डोळ्यात ते मावणार नाही
दुसऱ्यानं अनुभवलेलं हे जग
तुला वाचल्याशिवाय समजणार नाही

मांडले कित्येक अनुभव या लेखणीने
वाचण्या हे सारे, कित्येक जन्म पडतील उणे
वाचनाने दूर होईल अज्ञान तुझे
त्यासाठी तरी तु थोडंफार वाचलं पाहिजे

कित्येक पिढ्या समृध्द झाल्या
या लिहण्या वाचनाने
कित्येक बुडाले अज्ञानी काळोखात
जग समजुन न घेतल्याने

समजुन घेण्या हे जग सारं
अपुरे पडतील तुझे विचार
घेशील थोडा वाचनाचा आधार
तर जग समजेल तुला थोडंफार

नको म्हणु नको तु गड्या
हाच वेळ अमुल्य आहे
अंधुक होईल जेव्हा दृष्टी
तेव्हा आजचे विचार मोलाचे आहे

वाचन जगण्याला देईल बळ
आपोआप होतील प्रगल्भ विचार
त्यासाठी तरी थोडं तु समजुन घे
म्हणुन म्हणतो तुला गड्या
आल्या जिंदगीत समजुन घेण्या हे जग
थोडंफार तरी तु वाचुन घे
थोडंफार तरी तु वाचुन घे...!

कविता ऐकण्यासाठी येथे क्लिक करा..!

https://youtu.be/2WqReZmYX3Y

कवी : राहुल दादा बिचकुले
यवत, ता. दौंड, जि. पुणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...