आभाळ भरून आलं
डोंगरी धुकं पांगरलं
मंद वाऱ्याची झुळुक
घेऊन आली ती ओल
गंध मातीचा दरवळ
मनी उमलली हिरवळ
पारणं डोळ्याचं फिटलं
थेंब मातीला बिलगलं
थेंब टपोरे पडता
धरणी माय आनंदली
दुष्काळाच्या चिरा मातीत
चिर दुःखाची बुजली
आठ्या दुष्काळाच्या कपाळी
आनंदात विरून गेल्या
जगाचा पोशिंदा शेतकरीदादा
जमीन घेतोय कसायला
कोरडेपणा आता गेला
निसर्ग सारा बदलला
उघड्या बोडक्या माळाला
हिरवा अंकुर उमलला
पशु पक्षी वृक्ष वेली
जणु नव्याने जन्मा आली
पाऊस निसर्गाच देणं
सारी किमया त्यानं केली
सारी किमया त्यानं केली

कवी. राहुल दादा बिचकुले
माणकोबावाडा यवत, ता. दौंड, जि. पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी