शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१

आला श्रावण श्रावण

 आला श्रावण श्रावण

बहरून येतंय मन
हलक्या पावसाच्या सरी
त्यात डोकावतय ऊन

असा निसर्गाचा लपंडाव
जातो मनाला स्पर्शून
लवलवती कोवळी पाती
भिजुन जाती दवानं

इंद्रधनु तो दिसे अंबरी
मंद वाऱ्यासवे बरसती सरी
गधं दरवळ पसरतो छान
गातो श्रावणाचे गुणगान

असा श्रावण श्रावण
गातो श्रद्धेचं गुणगान
भक्तीमध्ये होऊन तल्लीन
शिवमंदिरी येती भक्तजन

रविकिरणे येती अंगणी
प्रकाश सोनेरी दिसतो छान
असा श्रावण श्रावण
आहे निसर्गाचं वरदान

कवी : राहुल दादा बिचकुले
यवत. ता. दौंड, जि. पुणे
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...