वर्षाकाठी हो सण एकदा
बैल पोळा आला
आला आला आला बैलपोळा आला
आता सजवू नंदीला, सजवू बैलालाआयुष्य भर त्याने दिली हो साथ
सोनं पिकवलं आपल्या शेतात
त्याचे ते ऋण उतराई म्हणून
आज या सणाला करूया पुजनदुःख भरल्या जिवनात
ओढूनी नांगर
हलका केला माझ्या
डोईवरचा भार
दुःख दूर केलं
दिलं सुखाचं हो दान
आज या सणाला करूया पूजनचढविली अंगावरी मोतीयाची झुली
सुंदर रंगानं बैलं सजविली
भाळी बाशिंग शोभतया छान
आज या सणाला करूया पूजनशेतकरी दादा करी उपवास
प्रेमानं भरवी पुरणपोळीचा तो घास
गळ्यात बांधल्या अलंकार माळा
शिंगात शिंगोळ्या शोभती छान
आज या सणाला करूया पूजनशेतकरी बैलं यांचं वेगळंच नातं
दुःख होऊद्या कोणाला
पाणी दोघांच्या डोळ्यात
जगामधी बळीराजाला वेगळाच मान
आज या सणाला करूया पुजन
The festival of baliraja has come ...!
कवी/शेतकरी मित्र : राहुल दादा बिचकूले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी