कितीही संकटं येउदेत
घर उघड्यावर येणार नाही
कारण दारात उभा ठाकलेला असतो
तो घरातला बापमाणुसखरबुडे गठ्ठे पडलेले हात त्याचे
कशानेही मुलायम होत नाही
कारण सारं आयुष्य वेचलेलें असते
त्याने घराची ढाल बनुनकसलेलं शरीर आणि फाटलेला सदरा
त्याला कमीपणाचा वाटत नाही
कारण त्यानं खरं जग पाहिलेलं असतं
जे फक्त हसतं दुसऱ्याकडे पाहुनअनुभवाची शिदोरी उराशी बांधुन
तो रोजच संघर्ष करत असतो
कधीच डगमगत नाही तो
घर कोलमडेल म्हणुनघरातला कर्ता धर्ता
घराचा आधार असतो तो
घरासाठी सतत झिजतो
असा बापमाणुस असतो तो
असा बापमाणुस असतो तो…!
कविता ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कवी : राहुल दादा बिचकुले
यवत, ता. दौंड, जि. पुणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी