काय जादू झाली
भुरळ पडली मनाला
शब्द तुझे ते भावले
विसरलो मी स्वतःला
काय सांगु तुला
मन काहीच बोलेना
नाही दिसलीस तु
तर बुद्धी माझी गं चालेना
झाकता डोळे माझे
रूप तुझेच दिसते
अंगी उमटतो शहारा
जणु स्पर्शात तुच भासते
मन मनाशी बोलते
भाव तुझ्या मनातले
न बोलताच समजते
डोळे सारेच सांगते
अशी खाणाखुणांची ती भाषा
समजते आता मला
काय समजु मी हे सारं
प्रेम म्हणतात का याला
प्रेम म्हणतात का याला…!
कवी राहुल दादा बिचकुले
यवत ता. दौंड जि. पुणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी