रविवार, ५ डिसेंबर, २०२१

रक्तरंजित भयपर्वाचं चिरंतन गारुड ...! कृष्णाकाठचं भयपर्व...

 डॉ.विठ्ठल बापूजी ठोंबरे

यांच्या आगामी प्रकाशित होणाऱ्या,
बापू बिरु वाटेगावकर
यांच्यावर आधारित कादंबरी
…कृष्णाकाठचं भयपर्व…
मधील मनोगताचा हा काही भाग .मनोगताचे शीर्षक :

लेखक : डॉ. विठ्ठल बापुजी ठोंबरे


▪️रक्तरंजित भयपर्वाचं चिरंतन गारुड ▪️


…बापू बिरु प्रदीर्घ काळ मानवी रक्ताची रंगपंचमी खेळत राहिला, ती गरीब सामान्य जनतेवर सदैव जुलूम, जबरदस्ती, अनन्वित अत्याचार करणाऱ्या गुंडपुंड, डाकू, मवाली, धनदांडगे सावकार यांच्या हरामी रक्ताची ! त्याच्या नावावर एकुन बारा खून. तुरुंगात जायच्या अगोदर दहा आणि सुटून आल्यानंतर दोन. हाफ मर्डर पस्तीस. मात्र पोलीस खासगीत सांगतात, " बापू बिरूनं पंचवीसपेक्षा अधिक खून केले असावेत. ' हाफ मर्डर' आणि त्याच्याकडून ' तडाखं ' खाल्लेल्यांची मोजदाद करता येणं केवळ अशक्य."
बापू बिरूनं फक्त गुंडापुंडांचं नामोनिशाण कायमचं मिटवलं असं नव्हे; तर या भागात नवऱ्यांनं टाकून दिलेल्या शेकडो स्त्रियांचं नांदणं सुरळीत करून दिलं. विनाकारण दुसऱ्याचं नुकसान करणाऱ्यांकडून दंड म्हणून अनेकांना नुकसानभरपाई मिळवून दिली. माजूर्ड्या सावकारांच्या टाळक्याला थेट 303 ची बंदूक लावून अनेकांचं कर्ज माफ करण्यास भाग पाडलं. गावगुंडांनी दहशतीच्या बळावर लाटलेल्या अनेकांच्या जमिनी संबंधित शेतकऱ्यांना परत मिळवून दिल्या. आयबायांची राजरोस अब्रू लुटणाऱ्या लिंगपिसाटांच्या जाहीरपणे हत्त्या केल्या. …आणि ' या भागावर फक्त बापू बिरुचच न्यायाचं राज्य चालतं ' हे अनेक घटना-प्रसंगातून दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील तत्कालीन गुन्हेगारी साम्राज्याला दाखवून दिलं. तब्बल ४० वर्षे या भागावर बापू बिरुचा एकछत्री अंमल राहिला.
बापू बिरूनं कधी दरोडा टाकला नाही.खंडणी गोळा केली नाही.विनाकारण कुणाला त्रास दिला नाही.पोलिसांवर कधी छुपा हल्ला केला नाही. प्रत्येक स्त्रीचं स्थान त्याच्या लेखी आई किंवा बहिणीपेक्षा वेगळं नव्हतं. फरार काळात त्यानं समांतर न्यायालय चालवलं. सत्याची कास कधीही न सोडता अनेक न्यायनिवाडे केले.त्यामुळे त्या काळी गोरगरीब जनता आणि स्त्रियांना बापू बिरूचा फार मोठा आधार वाटत होता.त्याला ते रक्षणकर्त्याच्या भूमिकेत बघत होते.आपोआपच जनसामान्यांमध्ये त्याची " रॉबिनहूड " अशी प्रतिमा निर्माण झाली.पहाटे जात्यावर धान्य दळताना इथल्या सासुरवाशिणींच्या मुखातून अलगद ओवी बाहेर पडू लागली…


बापू धर्माचा ग भाऊ माझा।
वाळवं तालुक्याचा राजा ।।


▪️हे सर्व लेखन संदर्भांनुसार केले आहे .याची जाणकार वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

  • कृष्णाकाठचं भयपर्व - बापू बिरु वाटेगावकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित कादंबरी- प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी-
    Google pay & Phone pe - 9822083654
  • सवलतीच्या दरात नोंदणी सुरू - कृष्णाकाठचं भयपर्व - बापू बिरु वाटेगावकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित कादंबरी : लेखक : डॉ.विठ्ठल बापूजी ठोंबरे.
  • मूळ किंमत ४०० ₹ । सवलतीत ३५० ₹ - नोव्हेंबर २०२१ च्या पहिल्या आठवड्यात पुस्तक आमच्या खर्चाने घरपोच पाठविले जाईल. तत्पूर्वी होणाऱ्या प्रकाशन समारंभाचे निमंत्रण आपणास आवर्जून दिले जाईल.
  • सोबतच्या बँक अकाउंट वर आपण पेमेंट करू शकाल.
    Jai Malhar Prakashan
    Bank of India
    Branch : Swargate Pune
    A/C NO : 050820110000607
    IFSC : BKID0000508

▪️ सदर बँक अकाउंट मध्ये पैसे जमा केल्यानंतर,त्याच्या डिटेल्स, त्याच बरोबर पिनकोड सह आपला संपूर्ण पत्ता 9822083654 या व्हाट्स ऍप क्रमांकावर पाठवावा.

▪️बापू बिरु वाटेगावकर उर्फ अप्पा महाराज यांच्या बालपणापासून ते मृत्यूपर्यंत म्हणजेच तब्बल ९६ वर्षांचा प्रदीर्घ कालखंड या कादंबरीत अभ्यासपूर्ण ओघवत्या शैलीत चित्रित झाला आहे.अप्पांच्या प्रासंगिक रेखाचित्रांसह अतिशय देखणी निर्मिती असलेल्या या पुस्तकाची अवश्य मागणी नोंदवावी ही विनंती.

आपले नम्र :
जयमल्हार प्रकाशन,पुणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...