हे तर रोजच आहे
आज काहितरी वेगळं करू
हा विचार जेव्हा मनात येतो
तेव्हा समजुन जायचं कि,
आपण विचार करू शकतो…!
नुसतं शांत बसुन राहायचं
आणि मेंदूला गंजुन द्यायचं
तेव्हा माणुस म्हणुन मिरवायचा
अधिकार गमावलेला असतो
कारण माणुस हा सर्वात
बुद्धिमान प्राणी समजला जातो…!
सकाळची किरणे अंगणात येतात
आणि आपल्याला सांगुन जातात
आज काहीतरी नवीन करून दाखव
आणि तु अजुन थांबलेला नाही
हे साऱ्या जगाला शिकव…!
थांबु नकोस चालत रहा तु
जग पाहत असताना
एक वेगळी ओळख निर्माण कर तु
संपुन जाईल एकदिवस तुझेही अस्तिव
म्हणुन या जागेवर तुझी ओळख निर्माण कर तु…!
कविता ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
कवी : राहुल दादा बिचकुले
यवत, ता. दौंड, जि. पुणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद @ माझी लेखणी