रविवार, ५ डिसेंबर, २०२१

बिरोबा देवस्थान आरेवाडी माहितीपट

 माझा गाव माझा अभिमान

आरेवाडीचा लौकिक महान

आरेवाडी हा शब्द जरी कानी पडला तरी डोळ्यासमोर उभे राहते ते बिरुदेवाचे भव्यदिव्या आनी देखणे मंदिर , या काशिलिंग बिरूदेवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीला धनगर समाज्याची काशी असेही म्हणले जाते. सांस्कृतिक व धार्मिक अधिष्ठान असलेली ही भूमि अलीकडे विविध क्षेत्रात नावारूपाला येत आहे त्याबद्दल थोडेसे…

आरेवाडी हे गाव सांगली जिल्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील असून विविध कलागुण असलेले गाव म्हणून नावाजले जात आहे. बिरोबा देवाच्या शिखरावरील सुवर्ण कलशाने तर गावची शान आनकीन वाढवली आहे . हे गाव संस्कृती जतनामध्ये तर आघाडीवर आहेस पण अलीकडे कला , क्रीडा , साहित्य , शिक्षण , शेती , क्षेत्रात ही आंतराष्ट्रीय पातळीवर नामचित ठरत आहे .

गावची लोकसंख्या ही 3106 इतकी आहे , यामध्ये महिला 1481 तर पुरुष हे 1625 इतके आहेत . यामध्ये वयोगट निहाय पाहणी केली तर एक ते अठरा म्हणजे लहान गटात एकूण नवशे चोवीस चिमुकले आहेत . यामध्ये 409 मुली आणि 515 मुले आहेत . म्हणजे जवळपास 30% गाव 1ते 18 या अवस्थेत आहे.

आजचा तरुण गावचा व देशाचा आधारस्तंभ मानला जातो ,तसेच अठरा ते चाळीस या वयोगटातील लोकसंख्या म्हणजे करती कमावती आणि काहीही करण्याची धमक असलेली तरुणांची संख्या ही जास्त आहे . यागटात 1169 एवढी लोकसंख्या आहे.यामध्ये प्रामुख्याने 550 महिला व 619 पुरुष आहेत . तसेच जून ते सोन मानली जाणारी अर्थात जुन्या आठवनींचा माहितीचा खजिना म्हणून गणना होत असलेल्या लोकांची संख्या ही गावात 1101 इतकी आहे . त्यामध्ये 521 महिला व 490 पुरुषांचा समावेश आहे .

हे झाल लोकसंखेच्या बाबतीत , पण क्रीडा क्षेत्रात ही या गावचा खूप मोठा नावलौकीक आहे . खो -खो या खेळात राष्ट्रीय पातळीवर गाजलेले खेळाडू या गावात घडले आहेत. आरेवाडी च्या कुस्तीचे नाव तर गावातील पैलवानाणी सातासमुद्रापलीकडे नेले आहे . पेरू, मंगोलिय , चीन , अश्या विविध देशात प्रकाश व बापू या बंधूनी गावचा नावलौकिक वाढविला आहे . तसेच राष्ट्रीय पातळीवर नाव करणारे खेळाडू ही आहेत . यामध्ये धावणे असेल त्याचबरोबर वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात शुभम कोळेकर ने राष्ट्रीय विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे ही अभिमानाची बाब आहे .अश्या विविध खेळात नावलौकीक आहे .
सांस्कृतिक क्षेत्रात या गावातील कैफत नृत्याने म्हणजे गजनृत्याने इंग्लंड व रशिया दौरा करुन अटकेपार झेंडा नेला आहे . दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या गोऱ्या लोकांना ही आपल्या ढोलाच्या तालावर ताल धरायला लावला .कला ,क्रीडा , साहित्य अश्या विविध क्षेत्रात ही आरेवाडी हे गाव अग्रेसर आहे. या गावात शिक्षकांची संख्या ही 57 आहे . हे सर्वजण एक पिढी घडवण्याचे काम करतात.

देशाचे आधुनिकरणात व विकास क्षेत्रात ज्यांचे मोलाचे योगदाना आहे ते इंजिनीअर गावात 44 पेक्षा जास्त आहेत . आपण सर्वजण डॉक्टर यांना देव मानतो आपल्या गावात सर्व डॉक्टर मिळून 27 आहेत . ही अभिमानाची गोस्ट आहे . देशभरात आपण प्रत्येक सणाला आनंद साजरा करतो पण स्वतःचा आनंद न पाहता जे देशासाठी कार्य करतातं ते सैनिक आपल्या गावात 92 आहेत यामध्ये पोलीस सेवेत कार्य करणाऱ्यांचा ही समावेश आहे . तसेच सध्या 50 ते 60 मुले सैन्य दलात समाविष्ट होण्यासाठी सराव करत आहेत .

आजकाल सगळीकडे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना तरुण दिसतात . या गावातील दहा पेक्षा जास्त तरुणांनी या क्षेत्रात यश मिळवले आहे . आणि सध्या लोकवर्गणी मधून उभा केलेले बिरोबा स्टडी सेंटर मध्ये 20 पेक्षा जास्त तरुण याचा अभ्यास करत आहेत . जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी अर्थात कृषी क्षेत्रात ही गावाने विक्रमी डाळिंब उत्पादन घेत लंडन परेंत भरारी घेतली .

खरंच हे सर्व जाणून घेतले तर आपोआप ओठांवर शब्द येतात ,
काट्या कुट्याचा तुडवित रस्ता
चल बगाय माझ्या गावाला दोस्ता
अश्या सर्वगुण संप्पन्न गावात मी जन्मलो घडलो याचा मला सार्थ अभिमान आहे . माझ्या गाव पंढरीची विकास आलेख असाच वरती जावा , गावातील तरुण पिढी निर्व्यसनी, निरोगी राहावी हीच बिरोबा चरणी प्रार्थना

श्री क्षेत्र बिरोबा देवस्थानच्या मायभूमी आरेवाडी चा एक व्हिडीओ रुपी माहितीपट प्रत्येकाने आवश्य पहा...

https://youtu.be/iSLxXJ0UWKA

samadhan kolekar

लेखांकन : समाधान कोळेकर
आरेवाडी, कवठेमहांकाळ, सांगली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद @ माझी लेखणी

महाराज आज स्वराज्याला पुन्हा तुमची गरज आहे...

जगामध्ये हेवा वाटावा असा माझा राजा पुन्हा जन्मा यावा... महाराज... ऋणानुबंध जोडले स्वराज्याचे  भाग्य असावे असे आमुचे मावळे व्हावे...